थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ladki Bahin Yojana Ekyc ) 'लाडकी बहीण' योजनेतील ज्या महिलांनी केवायसी केली नाही आहे त्या महिलांना यापुढे लाडकी बहिण योजनेचे हप्ते मिळणार नाहीत. यासोबतच त्यांची नावे या योजनेतून बाद केली जाऊ शकतात. सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंत e-KYC अनिवार्य केले आहे.
ज्या महिला या वेळेत e-KYC करणार नाही त्यांचा लाभ थांबणार आहे. लाडक्या बहिणींना दर महिना दीड हजार रुपये दिले जात होते. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींना ही रक्कम मिळत होती. मात्र सर्वच महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला पाहायला मिळत आहे.
लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्यासाठी दिलेली ई-केवायसी करण्याची मुदत आज संपत आहे. या यासोबतच आज मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्यामुळे आता या केवायसीला मुदतवाढ मिळते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केवायसी नसल्याने लाभ लाटणाऱ्यांवर आता कारवाई करण्यात येणार असून त्यामुळे साठ लाख लाडक्या बहिणी बाद होण्याची शक्यता आहे. आजच्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summery
केवायसी नसलेल्या लाडक्या बहिणी योजनेतून बाद होणार?
60 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद होणार?
केवायसी नसेल तर लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही