संतोष परब हल्ल्याच्या सुनावणीला जिल्हा न्यायालय ओरोस येथे सुरूवात झाली आहे. संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यात आमदार नितेश राणे यांच्या बाजुने अॅड. संग्राम देसाई युक्तिवाद करत आहेत .तर संतोष परब यांच्या कडुन सरकारी वकील भुषण साळवी यांचा युक्तिवाद सुरु झाला आहे.त्यामुळे आमदार नितेश राणे यांना जामीन मिळणार का?याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहीले आहे.
- हल्ला करणारा नितेश राणे आणि गोट्या सावंत याना कळवायला पाहिजे असं का म्हणतो याचाच शोध पोलिसांनी केलाय आणि तोही वेळ घेऊन तपास केलाय- घरत
- धडक दिलेली व्यक्ती धडक देऊन थांबली नाही तर फिर्यादिवर चाकूने वार करतायत याच सगळ फुटेज आहे – घरत
- गाडीला मागून घडक देणे हे जाणूनबुजून केलेले कृत्य- घरत
- पोलिसांविरोधात तुमची तक्रार नाही मग तुम्ही कोर्टाला काय दाखवत आहात- घरत
- विशिष्ठ प्राण्याचं आवाज काढलं म्हणून सूड काढला हे चुकीचं – घरत
- सरकारी वकील प्रदीप घरत आता बोलतायत
- 24 डिसेंबर रोजी विधानसभा पायऱ्यांवर जे काही घडलं एका मंत्र्याला हिंवण्यात आलं आणि त्यानंतरच नितेश राणे यांना अटक करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि राग आणि द्वेष ठेऊनच नितेश राणे यांना अटक करण्याचा डाव आहे – देसाई
- 23 /12/ 2021 ला 120 ब कलम वाढवण्यात आलंय- संग्राम देसाई
- नितेश राणे आणि आरोप सचिन सातपुते यांचं संभाषण पोलिसांनी हस्तगत केला आहे cdr प्राप्त झाला आहे- देसाई
- सगळं सापडलेलं असताना आता आरोपींना समोरासमोर बसवून काय साध्य करायच आहे पोलिसांना-दे
- सगळ्या फिर्यादीमध्ये कुठेही गोड्या सावंत आणि नितेश राणे यांच्या बाबत दुष्मनीबाबत उल्लेख नाही- देसाई
- Fir रजिस्टर करायला का उशीर झाला घटना 11 वाजता घडते तर 4 वाजता fir का – देसाई
- आरोपींची नावच मीडियाला का सांगण्यात आली नाहीत पहिल्या दिवसांपासून हे सगळं का लपवण्यात आलं- देसाई
- जखमी माणसाला उपचार करा, धीर द्या पण त्याचा सत्कार चक्क मंत्री करतात हे नेमकं काय प्रकरण आहे- देसाई
- 24 आणि 25 डिसेंम्बर या दोन दिवशी नितेश राणे आणि गोट्या सावंत यांची चौकशी पोलिसांनी केलीय मग हे सगळं जाणूनबुजून केलं जातंय का – देसाई
- मोबाईल जप्त करायचं आहे असं पोलिसांकडून सागितलं जातंय मग दोन दिवस चौकशीसाठी बोलावलं त्यावेळी मोबाईल का जप्त केले नाहीत- देसाई
- तब्बल एक तास संग्राम देसाई युक्तिवाद करत आहेत
- ज्यांच्यावर हल्ला झाला त्या संतोष परब यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला-देसाई
- एखाद्या व्यक्तीवर हल्ला होणे चुकीचे आहे.पण सध्या निवडणूक आहे या निवडणूकीच्या वेळी हल्ला झाला रक्त पडले त्यामुळे पत्रक काढुन निवडणूकीच्या रिंगणात रक्ताचा बदला घ्या -देसाई
- ज्या पोलिसांकडून गुप्तता सर्व आरोपींच्या बाबतीत पाळता तर नेमकी मग पेपरला पोलिस नोटीस देऊन काय गुप्तता पाळण्यात आली-देसाई
- 25 तारीखला रात्री एका संशयित आरोपीला दिल्लीतून अटक केली.व ईतर चार जनाना छुप्या मार्गाने कोर्टात हजर केले जाते.या संपुर्ण घटनेत पोलिसांकडून मौन का धरले जाते.-देसाई
- सामान्य माणसाला जनतेला कुठेतरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नितेश राणे व गोट्या सावंत यांना बदनाम करण्याचे षडयंत्र-देसाई
- सर्व चॅनलवर बातमीत बाईट देऊन टाकली सतीश सावंत पोलिसांना का नाही सांगत.-देसाई
- घडलेल्या घटनेपासून पोलिस स्टेशन 3 किलोमीटर अंतरावर आहे-देसाई
- पोलिसांनी सगळं रिकव्हर केलं आहे तसेच न्यायालयासमोर 164 खाली फिर्यादीचा जबाब नोंदवण्यात आला आहे- देसाई
- नितेश राणे व गोट्या सावंत यांच्या बाजूने युक्तिवाद अॅड संग्राम देसाई करत आहे.