बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Prashant Jagtap ) महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप राजीनामा देणार असल्याची माहिती मिळत आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास प्रशांत जगताप यांचा विरोध आहे. प्रशात जगताप यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा पाठवल्याची माहिती मिळत असून माजी नगरसेवक विशाल तांबे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवे पुणे शहर अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
काल मुंबईत झालेल्या बैठकीनंतर प्रशांत जगताप यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
राष्ट्रवादीला मोठा धक्का
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याने प्रशांत जगताप नाराज