आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. विधानसभेत अवकाळी पावसावर चर्चा होणार असून अनेक मुद्द्यांवर देखिल चर्चा होणार आहे. कांदा निर्यांत बंदी या मुद्द्यावर देखिल चर्चा होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन चांगलेच आक्रमक झाले आहेत. कांदा निर्यांत बंदीविरोधात विरोधक पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत. गळ्यात कांद्यांच्या माळा घालून हे आंदोलन करण्यात येत आहे.
कांद्याचा वांदा करणाऱ्या सरकराचा धिक्कार असो, कांद्याची निर्यातबंदी हटवलीचट पाहिजे. शेतकरी झाला कासावीस खोके सरकार 420 अशा घोषण विरोधकांकडून देण्यात येत आहेत.