महाराष्ट्र

धक्कादायक! दोन चिमुकल्यांसह महिलेची तलावात उडी

साताऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह गावलगतच्या तलावात उडी मारुन जीवन संपवल्याची घटना घडलीय.

Published by : shweta walge

साताऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह गावलगतच्या तलावात उडी मारुन जीवन संपवल्याची घटना घडलीय. या घटनेची माहिती समजताच पती स्वप्नील बापू चव्हाण यानेही विष प्राशन करून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पतीवर उपचार सुरू आहेत. या घटनेने तालुक्यात एकाच खळबळ उडाली आहे.

माण तालुक्यातील धामणीमध्ये आज सकाळी एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह जीवन संपवल्याची घटना घडलीय. महिलेचे नाव ऐश्वर्या स्वप्नील चव्हाण असून वय 25 आहे. तर मुलीचं नाव शिवानी वय 3 महिने व स्वरांजली वय 6 वर्षे या आपल्या मुलींसह गावलगतच्या तलावात मध्यरात्री जीवन संपवलंय. घटनेची माहिती समजताच पती स्वप्नील बापू चव्हाण वय 28 यानेही विष प्राशन करून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पतीवर उपचार सुरू आहेत. स्वप्नील याला तात्काळ म्हसवड येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या घटनेची माहिती समजताच म्हसवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तीनही मृतदेह तलावातून बाहेर काढले. या घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार अधिक तपास करत आहेत.

दरम्यान स्वप्नील आणि ऐश्वर्या यांचा गेल्या सहा वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. गवंडी काम करणाऱ्या स्वप्नीलचा ऐश्वर्यासोबत सुखी संसार सुरू असतानाच काल मध्यरात्री ही अघटित घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा