महाराष्ट्र

औषध-गोळ्यां विना कोणालाही परत पाठवू नका, पालकमंत्री यशोमती ठाकूर अधिकाऱ्यांना आदेश

Published by : Lokshahi News

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी आणि औषधांसाठी आलेल्या कोणत्याही रुग्णाला औषधोपचार किंवा औषध आणि गोळ्या दिल्याशिवाय परत पाठवू नका असे निर्देश अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आरोग्य अधिकार्‍यांना दिले

अमरावती जिल्ह्यातल्या मार्डी येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अचानक भेट दिली. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषध आणि गोळ्या मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी पालकमंत्र्यांकडे आल्या होत्या. या निमित्ताने पाहाणी करण्यासाठी त्यांनी मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता आरोग्य केंद्राची पाहणी करून संबंधितांना योग्य सूचना दिल्या.

उपचारासाठी आलेल्या रुग्णांची चर्चा करून त्यांना काय अडचणी भेडसावत आहेत, याबाबत सविस्तर माहिती घेतली त्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना योग्य उपचार सोबतच औषध आणि गोळ्या देण्यात याव्यात त्यांना बाहेरून काहीही खरेदी करायला लागू नये असे निर्देश आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?