महाराष्ट्र

Watch video | तरुणाने कापला तलवारीने केक; पोलिसांनी दिलं कोठडीच ‘गिफ्ट’

Published by : Lokshahi News

मयुरेश जाधव | उल्हासनगर शहरात तरुणाने तलवारीने केक कापत वाढदिवस साजरा केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात केक कापणाऱ्या दोन तरुणांना बेड्या ठोकत त्यांना बर्थडे गिफ्ट दिलं आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प २ मधील आझाद नगर परिसरात राहणाऱ्या समीर शेख याचा बुधवारी वाढदिवस होता. यानिमित्ताने बुधवारी रात्री तरुणांच्या गर्दीत आझाद नगर परिसरात बर्थडे सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी समीर शेख आणि फौजी लबाना या दोघांनी तलवारीने केक कापला. याचा व्हिडीओ त्यांच्याच सोबतच्या काही तरुणांनी मोबाईलमध्ये चित्रित केला आणि तो व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत शोधाशोध सुरू केली. काही तासातच समीर शेख आणि फौजी लबाना या दोघांनाही उल्हासनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून केक कापण्यासाठी वापरण्यात आलेली तलवार आणि एक छोटा चाकू हस्तगत करण्यात आला.

अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी उन्माद घालत शस्त्रांचा वापर केल्याबद्दल त्यांच्यावर जमावबंदी, पॅन्डेमिक ऍक्ट यासह हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी या तरुणांना पोलिसांनी कोठडीचं गिफ्ट दिलं असून त्यांच्यासोबत असलेल्या इतर ५ ते ६ तरुणांचा शोध सुरू असल्याची माहिती उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raigad : रायगडमध्ये समुद्रात संशयास्पद बोट आढळली; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

Navi Mumbai : नवी मुंबईतील तुर्भेच्या गोडाऊनला भीषण आग

Latest Marathi News Update live : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Harbour Line : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद