महाराष्ट्र

छेडछाडीला कंटाळून युवतीची आत्महत्या

Published by : Lokshahi News

संदिप जेजूरकर, मालेगाव ( नाशिक ) | नाशिकच्या मालेगावमध्ये उड्डाणटप्पू युवकाच्या एकतर्फी प्रेम व छेडछाडीला कंटाळून आत्महत्या एका तरूणीने आत्महत्या केल्याची घटना घडली.आशिया मोहंमद कासीम असे २० वर्षीय तरुणीचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मालेगावच्या जाफर नगर भागात राहणाऱ्या आशिया आणि जाफरीन या दोन भगिनी स्वतः शिक्षित आणि समाजाच्या रूढी परंपरेव्यतिरिक्त राहणं पसंत करणाऱ्या मुली होत्या. शहरातील एका भागात त्यांचे ब्युटीपार्लर देखील आहे. त्यांच्या या फॅशनेबल राहणीमान आणि सुंदरतेवर गल्लीतील टवाळखोर मुलांची वक्रदृष्टी त्या बहिणींवर पडली आणि छेडछाड सुरू झाली.या तरुणीने छेडछाड होत असल्याबाबत यापूर्वी गल्लीत तसेच पोलिसांना देखील कळवले होते.मात्र कोणीच लक्ष देत नव्हते.

अखेर तरुणीने गल्लीतील उड्डाणटप्पू युवकाच्या एकतर्फी प्रेम व छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मागील काही वर्षांपासून एक युवक या तरुणीस ब्लॅकमेल करून लग्न करण्यासाठी जबरदस्ती करीत होता. या मुलाच्या सोबत असलेल्या काही गुंडांनी मुलीच्या घरावर हल्लाही केल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे.या घटनेनंतर पवारवाडी पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, नातेवाईकांच्या तक्रारी नंतर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा