थोडक्यात
आमदार सुहास कांदे यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल
नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा
‘गुरुकृपा एंटरप्रायजेस’वर फसवणुकीचा गुन्हा
(Suhas Kande) आमदार सुहास कांदे यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात हा फसवणुकीचा गुन्हा करण्यात आला असून देवेंद्र गुरुदेव कांदे याच्या ‘गुरुकृपा एंटरप्रायजेस’ वर नाशिक जिल्हा परिषदेने हा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने संशयित देवेंद्र कांदे याच्या बेकायदेशिर कामे काढून फिर्याद नोंदविली असून जिल्हा परिषदेचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप रतन आहिरे यांनी सरकार पक्षाच्या वतीने ही फिर्याद नोंदविली आहे.