थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nashik) नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये जन्मदात्या आईनेच पोटची 6 मुलं विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एका 45 वर्षीय महिलेने तब्बल 14 मुला मुलींना जन्म दिला, मात्र या महिलेने घरची परिस्थिती हलाकीची असल्याने या 14 मुलामुलींपैकी 6 मुलं आणि मुली विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 10 ऑक्टोबर 2025 ला महिलेला मुलगा झाला. या मुलाचे वजन कमी असल्याने आरोग्य विभागाने या मुलाच्या तपासणीसाठी आशा कर्मचाऱ्यांना या महिलेच्या घरी पाठवले.
या महिलेच्या घरी आशा कर्मचारी गेल्यानंतर या महिलेने तिच्या पोटचा बाळाला विकल्याच सांगितलं आणि त्यानंतर या सगळ्या प्रकार समोर आल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता आई-वडीलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून मुलं विक्री केली नाही दत्तक म्हणून दिले असे मुलांच्या आईकडून चौकशीत खुलासा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Summery
नाशिकमधील मुल विक्री प्रकरण
आई-वडील चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात..
'मुलं विक्री केली नाही दत्तक म्हणून दिले', मुलांच्या आईकडून चौकशीत खुलासा