Nashik  
नाशिक

Nashik : अतिवृष्टीमुळे मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावातील नदीला पूर; एक युवक दुचाकीसह गेला वाहून, संपूर्ण थरार कॅमेऱ्यात झाला कैद VIDEO

पुराचं पाणी शिरलं गावात, एक युवक दुचाकीसह गेला वाहून

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • अतिवृष्टीमुळे मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावातील गलाठी नदीला पूर

  • पुराचं पाणी शिरलं गावात, एक युवक दुचाकीसह गेला वाहून

  • संपूर्ण थरार कॅमेऱ्यात झाला कैद

(Nashik ) राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक भागात मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत असून नाशिक जिल्ह्यात पडत असलेल्या अवकाळी अतिवृष्टीमुळे मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावातील मध्यरात्री गलाठी नदीला मोठा पूर येऊन ते पाणी थेट गावात घुसल्याने गावकऱ्यांची एकच धावपळ उडाली.

एक युवक संदीप बंडू खैरनार, वय वर्षे 22 हा त्याच्या दुचाकीवरून जात असताना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो दुचाकीसह वाहून गेला. सुदैवाने त्याला एका झाडाचा आधार मिळाला आणि तो जवळपास दोन तास त्या झाडावर होता.

गावच्या सरपंचांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाला कॉल करून बोलावले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले आणि त्या तरुणाला वाचविले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा