थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Malegaon Dongrale Crime) मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे एक धक्कादायक घटना घडली. तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली. खेळण्यासाठी बाहेर गेलेली चिमुकली खूपवेळ घरी आलीच नाही, त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केला, काही तासांनंतर घराच्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
त्यानंतर रात्री उशिरा गावकऱ्यांना मोबाईल टॉवरशेजारी तिचा मृतदेह आढळला. चेहरा छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याने तिची हत्या झाल्याचे प्रथमदर्शनीच स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी आणि अन्य अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.पोलीसांनी तत्काळ तपास सुरू करून विजय संजय खैरनार या तरुणाला ताब्यात घेतले.
आज आरोपीला पुन्हा मालेगाव कोर्टात हजर करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर आज आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टाने आरोपीला1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित कुटुंबीयांची सरकारी वकील संजय सोनवणेंनी यांनी बाजू मांडली. यावेळी आरोपीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडली.
Summery
मालेगावच्या 3 वर्षीय मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण
कोर्टाने आरोपीला सुनावली 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
पीडित कुटुंबीयांची सरकारी वकील संजय सोनवणेंनी मांडली बाजू