नाशिकात अचानक वादळी वारा व गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे तीव्र उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना काहीसा आल्हाददायक गारवा मिळाला मात्र अवकाळी पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा, कांदा बियाणे तसेच आंबा पिकाला फटका बसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.