थोडक्यात
सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी
सप्तशृंगी देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्री 12 वाजेपर्यंत खुलं राहणार
दिवाळीनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे
(Saptashrungi Devi) दिवाळीला सुरूवात झाली आहे. दिवाळीनिमित्त सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिवाळीनिमित्त भाविकांची होणारी गर्दी पाहता प्रत्येक भाविकाला व्यवस्थित देवीचे दर्शन घेता यावं, यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
सप्तशृंगी देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्री 12 वाजेपर्यंत खुलं राहणार असल्याची माहिती मिळत आहे. पहाटे ५ ते रात्री १२ पर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार आहे. या निर्णयामुळे भाविकांना व्यवस्थित देवीचे दर्शन घेता येणार असून गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी रोप वे ट्रॉलीची सुविधा देखील पहाटे 5 ते रात्री 11.30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.