Vande Mataram 
नाशिक

Vande Mataram : Malegaon :'वंदे मातरम्' गीताला १५० वर्ष पूर्ण; मालेगावच्या काकाणी प्राथमिक शाळेत वंदे मातरम् गायलं नाही

शासनाच्या वंदे मातरम् आदेशाची पायमल्ली

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • शासनाच्या वंदे मातरम् आदेशाची पायमल्ली

  • मालेगावच्या काकाणी प्राथमिक शाळेतील प्रकार

  • तहसीदार, शिक्षण विभागाकडून होणार कारवाई का?

(Vande Mataram) 'वंदे मातरम्' गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये 31ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर २०२५ या काळात संपूर्ण 'वंदे मातरम्' गीत गायला लावण्याचा आदेश देण्यात आला आहे. या पाश्वर्भूमीवर लोकशाहीनं मराठीनं उर्दू शाळांमध्ये रिअॅलिटी चेक केला आहे. उर्दू शाळांमध्ये वंदे मातरम् गायलं जाणार का ? या पाश्वर्भूमीवर लोकशाही मराठीकडून उर्दू शाळांमध्ये रिअ‍ॅलिटी चेक करण्यात आला आहे. वंदे मातरम् न गायल्यास शाळेवर कारवाई केली जाईल अशी माहिती पुणे आणि संभाजीनगरत शिक्षणाधिकाऱ्यांची दिली.वंदे मातरम् गीताचं मालेगाव शहरातील शाळांमध्ये गायन करण्यात आलं.

मात्र शहरातील नामांकित झुंबरलाल पन्नालाल काकाणी प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी आम्हाला असा कोणताच आदेश मिळाला नसल्याचे सांगत त्याची अंमलबजावणी केली नाही की वंदे मातरम् गीताचे गायन केलं नाही. लोकशाही मराठीच्या रिअॅलिटी चेकमध्ये ही बाब उघड झाली आहे.

शासनाचा वंदे मातरम् गायनाचा आदेश संपूर्ण राज्यात ऑनलाईन तसेच विविध समाज माध्यमांवर प्रकाशित झालेला असताना देखील शहरातील काकाणी प्राथमिक शाळेचे शिक्षक इतर कर्मचारी स्वतंत्र आदेशाची वाट पाहण्याचे निमित्त साधत त्या आदेशाची पायमल्ली करत वंदे मातरम् गीत शाळेत गाण्याचा सराव करीत नसल्याने आता तहसीलदार, शिक्षण विभाग काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा