पुणे

Pune Rain : मोठा अनर्थ टळला! पुण्यात मुसळधार पावसात होर्डिंग कोसळले

पुणे - नगर महामार्गावरील वाघोलीजवळ सणसवाडी परिसरात मंगळवारी सायंकाळी मुसळधार पावसात एक मोठे होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे.

Published by : Prachi Nate

पुणे - नगर महामार्गावरील वाघोलीजवळ सणसवाडी परिसरात मंगळवारी सायंकाळी मुसळधार पावसात एक मोठे होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. या होर्डिंगच्या खाली सात ते आठ दुचाकी अडकल्या असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना पावसामुळे झाली असून, कोसळलेले होर्डिंग उंच आणि मोठ्या आकाराचे होते. त्या वेळी पावसामुळे वाहतूक संथ होती, त्यामुळे मोठा अपघात होता होता टळला. अपघात घडल्यानंतर स्थानिक रहिवाशांसह वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू केले. तसेच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने तत्काळ हस्तक्षेप करत अडकलेल्या वाहनांची सुटका केली.

या होर्डिंगला प्रशासनाची परवानगी होती की नाही, याचा तपास सुरु आहे. पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात असून, संबंधित जाहिरात कंपनीवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरले असून, अशा प्रकारच्या धोकादायक होर्डिंग विरोधात ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेनंतर पुणे शहरातील इतर भागांतील धोकादायक आणि जुनी झालेली होर्डिंग्जची तपासणी करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. प्रशासनाने तत्काळ सर्व होर्डिंग्जची पाहणी करून जी होर्डिंग्ज अपायकारक ठरू शकतात, ती त्वरित हटवावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही स्थानिकांची अपेक्षा आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा