(Ajit Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळपासूनच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार सकाळपासून पुण्यात पाहणी दौऱ्यावर निघाले आहेत. पिंपळे सौदागरच्या रखडलेल्या रस्त्यांची त्यांनी पाहणी केली.
रखडलेल्या रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण करण्याच्या अजित पवार यांच्याकडून सूचनाही देण्यात आल्या. याच पाहणी दौऱ्याच्यावेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांना तंबी दिल्याचे देखील पाहायला मिळाले. 'शहरातील अतिक्रमण आणि फुटपाथवरील अनधिकृत वाहने तातडीने हटवण्याचे सक्त निर्देश त्यांनी दिले.
या कारवाईत कोणताही राजकीय हस्तक्षेप चालणार नाही 'आमची वाहनं असली तरी काढा, पण आजच झालं पाहिजे' असे अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.