थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Anjali Damania) मुंढवा येथील ४० एकर जमिनीच्या व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांचे नाव आल्यानंतर अजित पवार यांनी जमिनीचे व्यवहार रद्द करत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. या जमीन घोटाळा प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे.
अंजली दमानिया या प्रकणावर पत्रकार परिषद घेऊन मोठे खुलासे करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी अंजली दमानिया आज पुण्यात येणार असून जमिनीचे मूळ मालक असलेल्या कुटुंबाची अंजली दमानिया भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंढवा येथे ज्या जमिनीची कथित विक्री झाली त्या जागेला देखील दमानिया भेट देणार आहे. यासोबतच अमेडिया कंपनीच्या विरोधात दमानिया पुण्यात आंदोलन देखील करण्याची शक्यता आहे. तर या सगळ्या व्यवहार प्रकरणी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचे देखील अंजली दमानिया दुपारी भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण
अंजली दमानिया आज पुण्यात
जमिनीचे मूळ मालकांच्या कुटुंबांना अंजली दमानिया भेटणार