थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune) राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार असून असून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.उद्या 16 तारखेला मतमोजणी पार पडणार आहे.
या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल या 29 महानगरपालिकांमध्ये मतदान आज होणार आहे.
यातच पुणे महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळीला सुरूवात झाली असून अजित पवार, मुरलीधर मोहोळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यासोबतच गणेश बिडकर , रविंद्र धंगेकर, वसंत मोरे, रुपाली पाटील, प्रशांत जगताप यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे पाहायला मिळत आहे.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजप विरुद्ध अजित पवार अशीच लढत आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे आता पुण्यात कोण बाजी मारणार आणि पुणेकर कुणाला कारभारी बनवणार? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
पुणे महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी
अजित पवार, मुरलीधर मोहोळ यांची प्रतिष्ठा पणाला
पुण्यात कोण बाजी मारणार याकडे लक्ष?