थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Devendra Fadnavis) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होते.
आज 31 डिसेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. तर 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आता जोरदार तयारीला लागले असून सभांचे आयोजन करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे पालिकेसाठी 3 प्रचार सभा घेणार आहे. यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रचारादरम्यान एक दिवस पुणे दौऱ्यावर येणार असून प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
पुणे पालिकेसाठी मुख्यमंत्री घेणार 3 प्रचार सभा
अमित शाह देखील प्रचारादरम्यान पुणे दौऱ्यावर येणार
अमित शाह प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार