Pune 
पुणे

Pune : पुण्यात परदेशी महिलेकडून साडेसात कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त

पुणे-मुंबई-बेंगळुरू महामार्गावर अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Published by : Team Lokshahi

( Pune ) पुणे-मुंबई-बेंगळुरू महामार्गावर अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) पुणे विभागाने एका परदेशी महिलेकडून सुमारे ३.८१५ किलो मेथाम्फेटामिन जप्त केले असून, या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारमूल्ये सुमारे ७.६३ कोटी रुपये इतकी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

ही महिला दिल्लीहून बेंगळुरूकडे खासगी बसने प्रवास करत होती. गोपनीय माहितीच्या आधारे डीआरआयने ही कारवाई केली. पुणे सीमाशुल्क विभागाच्या सहकार्याने मुंबई-बेंगळुरू महामार्गावर संबंधित बसवर नजर ठेवण्यात आली.

महिलेची तपासणी करण्यात आली असता सुरुवातीला सामानात संशयास्पद काहीही आढळले नाही. मात्र बसची सखोल झडती घेतल्यानंतर मागील बाजूस लपवलेली एक अतिरिक्त पिशवी सापडली. त्या पिशवीत सलवार-सूट ठेवलेले होते आणि प्रत्येक कपड्याच्या पट्ट्यामध्ये पारदर्शक आवरणात पांढऱ्या रंगाचा स्फटिकासारखा पदार्थ सापडला.

प्राथमिक तपासणीत या पदार्थाचे स्वरूप 'मेथाम्फेटामिन' असल्याचे निष्पन्न झाले असून, अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधित परदेशी महिलेला तात्काळ अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग्ज तस्करी रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मिरा रोडमध्ये राज ठाकरे थोड्याच वेळात दाखल होणार

Devendra Fadanvis : "सर्व आमदार माजलेत...", पडळकर-आव्हाड वादावर मुख्यमंत्री फडणवीस संतापले

US on Pakistan : अमेरिकेचा TRF ला दहशतवादी संघटना घोषित करण्याचा निर्णय; पाकिस्तानला मोठा धक्का

Labubu Doll : का आहे 'लबुबू डॉल'ची क्रेझ ? ; विचित्र दिसणाऱ्या बाहुलीसाठी लोक लाखो रुपये का मोजतायत?