थोडक्यात
खडकवासला धरण चौपाटीवर अतिक्रमण विभागाची कारवाई
पुणे महापालिकेच्या कारवाईला स्थानिकांचा विरोध
रस्त्यावर येऊन स्थानिक नागरिकांचा विरोध
( Khadakwasla Dam) खडकवासला धरण चौपाटीवर अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईमुळे धरणाच्या परिसरातील अनधिकृत हॉटेल आणि चौपाट्यांवर हातोडा मारण्यात आला आहे. या पुणे महापालिकेच्या कारवाईला स्थानिकांनी विरोध केल्याचे पाहायला मिळत आहे.
रस्त्यावर येऊन स्थानिक नागरिकांनी याच विरोध दर्शवला आहे. हॉटेल अतिक्रमण काढत नाही फक्त गोरगरिबांच्या हातगाडींवर कारवाई केली जात आहे असा आरोप करण्यात आला असून याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे