थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Pune ) पुणे विमानतळावर महिलेकडून 72 लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पुणे विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिट ने दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई 6 डिसेंबर रोजी पुणे विमानतळावर करण्यात आली.
एअर इंडिया एक्सप्रेस आय एक्स 241 या विमानाने एक महिला प्रवासी बँकॉकवरुन पुणे विमानतळावर पोहचली. एअर इंटेलिजन्स युनिट च्या अधिकाऱ्यांनी त्या महिलेला चौकशीसाठी अडवले आणि तिच्या बॅग ची तपासणी करायला सुरुवात केली.
यावेळी त्यातील 2 चिप्स च्या डब्यात या महिलेने लपवलेला गांजा मिळून आला. त्याचे वजन केले असता ते 722 ग्रॅम इतके मिळून आले ज्याची बाजार भावानुसार 72.2 लाख रुपये किंमत आहे. संबंधित महिलेवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Summery
पुणे विमानतळावर महिलेकडून ७२ लाख रुपयांचा गांजा जप्त
चिप्सच्या डब्यात लपवला होता ७२२ ग्रॅम गांजा
पुणे विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिट ची कारवाई