(Pune) पुण्यातील येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात मानवी सांगाडा आढळून आला असल्याची चर्चा सुरु झाली आणि याची माहिती पोलिसांना देण्यात आली. भर चौकात मानवी सांगाडा आढळून आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
पुणे अहिल्यानगर रस्त्यावर असलेल्या चौकात मानवी हाडाचा सांगाडा काही लोकांनी पाहिला. भर चौकात मानवी सांगाडा आढळून आल्याने याची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि एकच धांदल उडाली. या सांगाडा डोके, धड आणि कमरेपर्यंत असल्याचे पाहायला मिळाले.
पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलील घटनास्थळी दाखल झाले आणि तो सांगाडा ताब्यात घेत तो व्यवस्थित तपासला असता लक्षात आले की, तो सांगाडा प्लास्टर ऑफ पॅरिसचा असून तारेचा वापर करून बनवण्यात आले आहे. मात्र हा सांगाडा रस्त्याच्या मधोमध कोणी आणून टाकला याची माहिती मिळाली नाही.