(Pune Indrayani River Bridge Collapse ) पुण्यात मावळ तालुक्यात कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला तर 51 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता इंद्रायणी नदीवरील कुंडमळा दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.
जिल्ह्यातील गावे आणि वाड्यातील धोकादायक लहान पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील गावे आणि वाड्या जोडणारे लहान पूल काढण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
यापूर्वी वेगवेगळ्या सरकारी यंत्रणाने केलेल्या ऑडिटचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र गुड्डी यांनी दिले आहेत.