Pune 
पुणे

Pune : पुण्यातील लोणी स्टेशन परिसरात चक्क इराणचे झेंडे

पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, पुण्याजवळील लोणी काळभोर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Published by : Team Lokshahi

(Pune ) पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, पुण्याजवळील लोणी काळभोर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले की, लोणी काळभोर स्टेशनच्या परिसरात इराणचे राष्ट्रीय झेंडे व अली खामेनीचे फोटो असलेले फ्लेक्स लावण्यात आले होते.

ही बाब लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व संबंधित झेंडे व फ्लेक्स त्वरित हटवले. प्राथमिक चौकशीत असे स्पष्ट करण्यात आले आहे की, हे फ्लेक्स एका धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आले होते. याचा इराण-इस्रायल संघर्षाशी कोणताही संबंध नसल्याचे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या संपूर्ण घटनेबाबत पोलीस विभागाकडून सखोल चौकशी सुरु असून, कोणत्याही प्रकारचा गैरसमज अथवा अफवांना थारा न देता नागरिकांनी शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा