थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune Koyata Gang) पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत पाहायला मिळत आहे. पुण्याच्या वाघोली मध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात पाच तरुणांनी दहशत माजवत कोयत्याने दुकानासमोर लावलेल्या लाईट फोडल्याची घटना घडली आहे.
या सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून काही गाड्यांवर देखील त्यांनी कोयता मारण्याचा प्रयत्न केला, यामध्ये शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांच्या घरासमोरील पार्क केलेल्या गाडीवर देखील कोयता मारल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील कोयता गॅंगची दहशत काही थांबत नसल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Summery
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत
वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड
घटनेचा सीसीटीव्ही समोर