थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune Mundhwa land Case) मुंढवा येथील ४० एकर जमिनीच्या व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांचे नाव आल्यानंतर अजित पवार यांनी जमिनीचे व्यवहार रद्द करत असल्याचे जाहीर केले. या जमीन घोटाळा प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी काल शीतल तेजवानीला अटक करण्यात आली असून आज तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता दिग्विजय पाटील यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी वेळ मागितला असल्याची माहिती मिळत आहे. या आधी चार दिवसांपूर्वी दिग्विजय पाटील यांनी आर्थिक गुन्हे शाखेत जाऊन जबाब दिल्याची माहिती मिळत असून पुन्हा पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते , मात्र दिग्विजय पाटील यांनी वेळ मागितल्याची माहिती आहे. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात शितल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातच आता चौकशीसाठी पुन्हा बोलावल्यास मी हजर राहीन, असे दिग्विजय पाटील यांनी पोलिसांना सांगितले. मात्र सध्या मला परदेशात जय पवारांच्या लग्नाला जायचे असल्याने, लग्नावरून परत आल्यानंतर मी पुन्हा चौकशीसाठी येईन, असेही त्यांनी स्पष्ट केले. दिग्विजय पाटील यांच्या चौकशीदरम्यान अनेक मुद्द्यांची तपासणी झाल्याने, आता पार्थ पवार यांच्या अडचणी देखील वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Summery
दिग्विजय पाटील यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी मागितला वेळ
या आधी चार दिवसांपूर्वी दिग्विजय पाटील यांनी आर्थिक गुन्हे शाखेत जाऊन जबाब दिल्याची माहिती
मात्र पुन्हा पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते