पुणे

24 लाखांची पाणीपट्टी आल्याने सोसायटीला घाम, महापालिकेची उडवाउडवीची उत्तरं

पुण्यातील बावधन परिसरातील एका मोठ्या गृहनिर्माण सोसायटीसमोर अचानक आलेल्या 24 लाख रुपयांच्या पाणीपट्टीच्या बिलामुळे खळबळ उडाली आहे.

Published by : Team Lokshahi

पुण्यातील बावधन परिसरातील एका मोठ्या गृहनिर्माण सोसायटीसमोर अचानक आलेल्या 24 लाख रुपयांच्या पाणीपट्टीच्या बिलामुळे खळबळ उडाली आहे. संबंधित सोसायटीमध्ये सुमारे 500हून अधिक सदनिका आणि काही व्यावसायिक आस्थापना असून, महापालिकेने दीर्घ कालावधीपर्यंत पाणीपट्टीचे बिल न पाठवता थेट वर्षभराचे बिल एकाच वेळी पाठवले. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे सध्या केवळ 24मिटर रीडर कार्यरत असल्यामुळे वेळेवर मिटर रीडिंग घेणे शक्य न झाल्याचे सांगण्यात आले असून दोन महिन्यांच्या ऐवजी वर्षभराचे थकीत बिल एकाचवेळी पाठवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीमध्ये दोन निवासी आणि एक व्यावसायिक पाण्याच्या जोडण्या आहेत. व्यावसायिक जोडणीस दर दोन महिन्यांनी सुमारे 80 हजार रुपये बिल येते आणि ते वेळेवर भरले जात होते. मात्र, वर्षभर महापालिकेकडून कोणतेही बिल आले नसल्याने आता एकदम मोठी रक्कम आकारण्यात आली आहे.

सद्य:स्थितीत शहरात 'समान पाणीपुरवठा योजना' राबवली जात असून, अनेक ठिकाणी अचूक मोजमाप करणारे स्वयंचलित मीटर बसवण्यात आले आहेत. सोसायटीच्या सचिवांनी सांगितले की, "आम्ही वेळेवर पाणीपट्टी भरत होतो, पण गेल्या वर्षभरात बिलच आले नाही. आता अचानक एवढ्या मोठ्या रकमेची मागणी केल्याने आर्थिक तणाव निर्माण झाला असून, महापालिकेकडे सवलतीसाठी विनंती केली आहे." महापालिकेने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

Latest Marathi News Update live : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना पदोन्नती किंवा आर्थिक लाभ होईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार