थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Parth Pawar) पार्थ पवार यांच्या कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया इंटरप्राइजेस कंपनीने 1800 कोटी रुपये किंमत असलेली जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी अनेक खुलासे समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार संदर्भात आज अहवाल येणार आहे. यातच आता अजून एक माहिती समोर येत आहे. अमेडिया कंपनीसाठी प्रायोगिक वनस्पती उद्यानातील झाडे तोडण्यासाठी झाडावर नंबर टाकण्यात आले होते.
लोकशाही मराठी न्यूजने वनस्पती औषधी उद्यान यातील झाडाची पाहणी केली. वनस्पती उद्यानातील झाडे तोडण्यासाठी झाडावर टाकलेले हे नंबर लोकशाहीच्या कॅमेरात कैद झाले. ही सरकारी वनस्पती उद्यान तात्काळ खाली करा असे लेखी आदेश निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी दिली होते.
Summery
पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरण
अमेडीया कंपनीसाठी झाडे तोडण्यासाठी लिहीण्यात आले नंबर
झाडावर लिहीलेले नंबर लोकशाहीच्या कॅमेऱ्यात चित्रीत