थोडक्यात
पुण्यात पोलीस शिपायाला बेदम मारहाण
पुण्यात स्वत: पोलीस असुरक्षित
रस्त्याच्या बाजूला लघवी करणाऱ्या पोलिसाला मारहाण
(Pune Breaking) पुण्यातून पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात पोलीस शिपायाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. उंड्री पिसोळी जवळ रस्त्याच्या बाजूला लघवी करणाऱ्या पोलीस शिपायाला ही बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
प्रवीण रमेश डिंबळे असे मारहाण झालेल्या पोलीस शिपायाचे नाव असून पोलीस शिपाई प्रवीण डिंबळे हे पुण्यातील भारतीय विद्यापीठ वाहतूक विभागात कार्यरत असून काल रात्री ते त्यांचे काम संपवून घरी जात असताना उंड्री पिसोळी जवळील कॅनॉलच्या फर्निचरच्या बाजूला लघवीसाठी थांबले होते.
त्याचवेळी एका चार चाकीतून आलेल्या अज्ञात 4 व्यक्तींनी गाडी थांबून त्यांना बेदम मारण केली. या मारणीत डिंबळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.