(Pune) पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रविवारी रात्री पुणे रेल्वे स्थानकाबाहेर एका तरुणाने महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
हातात कोयता घेऊन आरोपीने विटंबना करण्याचा प्रयत्न केला असून सुरज शुक्ला असे या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.