Pune Accident 
पुणे

Pune Accident : चांदणी चौकात भीषण अपघात; ट्रक चालकाचा जागीच मृत्यू

पुण्यात अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांची मालिका सुरूच आहे.

Published by : Team Lokshahi

(Pune Accident) पुण्यात अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांची मालिका सुरूच आहे. गंगाधाम चौकामधील अपघाताची घटना ताजी असतानाच चांदणी चौकात गुरुवारी रात्री आठच्या सुमारास भीषण अपघात घडला. मुंबईकडून बंगळुरूकडे जाणाऱ्या महामार्गावर एका ट्रेलर ट्रकने अर्टिगा कारला वाचवण्यासाठी अचानक ब्रेक लावला. त्यामुळे ट्रकमध्ये लादलेल्या लांब लोखंडी सळ्या जोरात पुढे सरकत केबिनमध्ये घुसल्या. या दुर्घटनेत ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर क्लीनर गंभीर जखमी झाला.

सदर ट्रक बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी सळ्या घेऊन जात होता. अपघाताची तीव्रता इतकी होती की ड्रायव्हरच्या केबिनमध्ये सळ्या घुसल्यामुळे चालकाचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर पोलीस आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले. जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून चौकात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी