थोडक्यात
पुणे गणेश काळे हत्या प्रकरण
हत्या प्रकरणातील दुसरा व्हिडीओ समोर
बोपदेव घाट रस्त्यावरील पेट्रोल पंप समोर गोळीबार
(Pune Breaking) कोंढवा परिसरात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. गणेश काळे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गणेश काळे हा आंदेकर टोळीतील दत्ता काळे याचा भाऊ असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेश काळेवर सहा राऊंड फायर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून त्याच्यावर कोयत्याने देखील वार करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता या प्रकरणातील दुसरा व्हिडिओ समोर आला असून बोगदेव घाट रस्त्यावरील पेट्रोल पंप समोर हा गोळीबार करण्यात आला.