थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune) पुणे पोलिसांनी गांजाचं मोठं रॅकेट उध्वस्त केलं आहे. पुण्यातील एका गांजा डीलर कडून पुणे पोलिसांना मोठी माहिती मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांनी पिंपरी चिंचवड शहरात जात ही मोठी कारवाई केली आहे.
पिंपरी चिंचवड भागातील एका माणसाने थेट घरामध्येच गांजा साठवला होता. त्या घरामध्ये धाड टाकल्यानंतर पुणे पोलिसांनी जवळपास चार कोटी रुपयांचा गांजा जप्त केला. आज दुपारी पुणे पोलीस पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती देणार आहेत.
Summery
पुणे पोलिसांनी केलं गांजाचं मोठं रॅकेट उध्वस्त
पुण्यातील एका गांजा डीलर कडून मिळाली होती पुणे पोलिसांना मोठी माहिती
पुणे पोलिसांनी पिंपरी चिंचवड शहरात जात केली मोठी कारवाई