(Varandha Ghat ) भोर येथून रायगड जिल्ह्यातील महाडला येणारा वरंध घाट आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळ्यात वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सप्टेंबर अखेरपर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीसाठी बंदी असणार आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. पावसाळ्यात घाटात अतिवृष्टी होते. या पार्श्वभूमीवर अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासनाने घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
वरंध वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहे. या कालावधीत प्रवाश्यांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केली आहे.