Khadakwasla Dam 
पुणे

Khadakwasla Dam : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी: खडकवासला धरण साखळीच्या पाणीसाठ्यात वाढ

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये पाणीसाठा वाढू लागला आहे.

Published by : Team Lokshahi

(Khadakwasla Dam) पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये पाणीसाठा वाढू लागला आहे. मागील दोन दिवसांपासून घाटमाथ्यावर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे ही वाढ झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

मागील वर्षी ही सर्व धरणे शंभर टक्के भरली होती. मात्र यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यांत तीव्र उन्हामुळे पाण्याची मागणी लक्षणीय वाढली होती. अशा परिस्थितीत दरवर्षीप्रमाणे जूनच्या मध्यापर्यंत पावसाची वाट पाहावी लागणार अशी शक्यता होती. मात्र यावर्षी 25 मेपासूनच पाण्याची आवक सुरू झाली असून 27मेपर्यंत एकूण साठा 5.74 टीएमसीपर्यंत पोहोचला आहे.

26मे रोजी एका दिवसातच 28 एमएलडी इतक्या पाण्याची भर पडल्याने नागरिकांसाठी ही अत्यंत दिलासादायक बाब ठरली आहे. सोमवारी खडकवासला परिसरात 16 मिमी, पानशेतमध्ये 99 मिमी, वरसगावमध्ये 92 मिमी आणि टेमघरमध्ये 70मिमी पावसाची नोंद झाली.

ही चारही धरणे मिळून 29.50 टीएमसी इतकी पाणीसाठवण क्षमता बाळगतात. याच धरणातून पुणे शहरासह जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा आणि सिंचन योजनांना पाणी दिले जाते. दरवर्षी जून अखेरीसच पाणीसाठा वाढतो. मात्र यंदा मेमध्येच पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाल्याने पाणी कपात टळण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा