थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune Breaking News) पुण्यातील महिलेचा पुरुषावर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आता कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुंगीच औषध देऊन कोल्हापूरच्या इसमावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
गौरी वांजळे असे या आरोपी महिलेचे नाव असून वकील असल्याची बतावणी करत महिलेकडून धमकी दिली जात असल्याची माहिती मिळत आहे. काही अश्लील फोटो काढून पैशांची मागणी देखील त्या महिलेकडून करण्यात येत होती. पुण्यातील महिलेचे राहते घरी तसेच कोल्हापूर येथील फिर्यादीच्या घरी देखील बळजबरीचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Summery
पुण्यातील महिलेचा पुरुषावर अत्याचार
कोथरूड पोलीस ठाण्यात महिलेवर गुन्हा दाखल
गुंगीचं औषध देऊन कोल्हापूरच्या व्यक्तीवर अत्याचार