(Pune Goodluck Cafe ) पुण्यातील सुप्रसिद्ध कॅफे गुडलकच्या बन मस्का पावमध्ये काचेचा तुकडा आढळून आला, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका ग्राहकाने गुडलक कॅफेमध्ये इराणी चहा आणि बन मस्का ऑर्डर केला होता. त्यामध्ये काचेचा तुकडा आढळून आला.
याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातील सुप्रसिद्ध कॅफे गुडलकचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली होती. त्रुटी दूर होईपर्यंत परवाना निलंबितच राहणार असल्याची माहिती मिळत आहे.