थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(BJP) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातील भाजप उमेदवारांना पक्षाकडून फोन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपकडून निश्चित केलेल्या उमेदवारांना पक्षाकडून फोन करण्यात आला.
'कामाला, प्रचाराला सुरुवात करा. उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी ठेवा, एबी फॉर्म लवकरच दिला जाईल.' असे भाजपकडून अनेक निश्चित केलेल्या उमेदवारांना फोन करण्यात आला. यासोबतच शक्ती प्रदर्शन न करता अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे.
Summery
'कामाला, प्रचाराला सुरुवात करा'
पुण्यातील भाजप उमेदवारांना पक्षाकडून फोन
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपकडून निश्चित केलेल्या उमेदवारांना फोन