थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune) पुण्यातील उरळी देवाची परिसरात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. धनगर वस्ती येथे रस्त्याने पायी चालणाऱ्या आई आणि मुलाला स्कूल बसने चिरडले असल्याची धक्कादायक घटना घडली असून या भीषण अपघातात पाच वर्षाचा मुलाचा जागीच मृत्यू तर आई गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
साईनाथ तुळशीराम भंगारे असे पाच वर्षाच्या मृत मुलाचे नाव तर रेखा तुळशीराम भंगारे असे आईचे नाव असून याप्रकरणी फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातानंतर संतप्त झालेल्या रहिवाशांनी मुलाचा मृतदेह उरळी देवाची पोलिसांसमोर आणून आक्रमक आंदोलन करत संताप व्यक्त केला आहे.
Summery
पुण्याजवळील उरळी देवाची परिसरात भीषण अपघात
पायी चालणाऱ्या आई आणि मुलाला स्कूल बस ने चिरडले
मुलाचा मृ्त्यू, आई गंभीर जखमी