pune 
पुणे

Pune : पुण्यातील नव्याने झालेला सिंहगड रोड वरचा उड्डाणपूल 66 ठिकाणी फोडण्यात येणार; कारण काय?

पुण्यातील नव्याने झालेला सिंहगड रोड वरचा उड्डाणपूल 66 ठिकाणी फोडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Pune) पुण्यातील नव्याने झालेला सिंहगड रोड वरचा उड्डाणपूल 66 ठिकाणी फोडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. नव्याने मंजूर झालेल्या मेट्रो मार्गासाठी सिंहगड रोडवरचा उड्डाणपूल तब्बल ६६ ठिकाणी फोडण्याचा प्रस्ताव असून काही दिवसांपूर्वीच सिंहगड रस्त्यावरील कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने ११८ कोटी रुपये खर्च करून हा नवा उड्डाण पूल बांधण्यात आला आहे.

केंद्र सरकारने नुकतीच खडकवासला ते हडपसर-खराडी आणि नळस्टॉप ते माणिकबाग या ३२ किलोमीटर लांबीच्या आणि ९८५८ कोटी रुपये खर्चाच्या नवीन मेट्रो मार्गाला मंजुरी दिली आहे. सिंहगड रोडवरचा हा उड्डाणपूल बांधताना मेट्रोच्या खांबांची जागा निश्चित केली असून, मेट्रोचे खांब उभारण्यासाठी ६६ ठिकाणी उड्डाण पुलाला छेद दिला जाणार आहे.

त्यामुळे उड्डाण पुलाची रुंदी जवळपास प्रत्येकी दोन मीटरने कमी होईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मेट्रोचा विचार करून या उड्डाण पुलाची रुंदी जास्त ठेवण्यात आली असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे आता उड्डाण पूल मेट्रोच्या कामासाठी अनेक ठिकाणी फोडण्यात येणार असून या नव्या मेट्रो कामामुळे उड्डाणपूल रुंद होणार असून याचा फटका आता सिंहगड रोडवरील वाहतुकीला बसणार आहे.

Summery

  • नव्याने मंजूर झालेल्या मेट्रो मार्गासाठी सिंहगड रोडवरचा उड्डाणपूल तब्बल ६६ ठिकाणी फोडण्याचा प्रस्ताव

  • केंद्र सरकारने नुकतीच या ३२ किलोमीटर लांबीच्या आणि ९८५८ कोटी रुपये खर्चाच्या नवीन मेट्रो मार्गाला मंजुरी दिली

  • आता उड्डाण पूल मेट्रोच्या कामासाठी अनेक ठिकाणी फोडण्यात येणार आहे

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा