थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Asim Sarode) पुण्यात पुन्हा चोरांची गँग सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. अॅड. असीम सरोदे यांच्या पुण्यातील ऑफिसमध्ये चोरी झाल्याची माहिती मिळत आहे.
पुण्यातील डेक्कन परिसरात हा प्रकार घडला असून भांडारकर रोडवर असलेल्या अॅड. असीम सरोदे यांच्या कार्यालयाबाहेरील दोन चंदनाची झाडे पहाटे 3.30 च्या दरम्यान चोरट्यांनी तोडून नेल्याची माहिती मिळत आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
चारचाकीत आलेल्या तीन ते चार चोरट्यांनी ही चंदनाची झाडे तोडून नेल्याची माहिती मिळत आहे.
Summary
असीम सरोदे यांच्या पुण्यातील ऑफिसमध्ये चोरी
चोरट्यांनी चंदनाची 2 झाडं तोडून नेली
पुण्यात पुन्हा चोरट्यांची गँग सक्रीय