( Pune Ganpati Visarjan ) पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुणे शहरातील मुख्य 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. तर 10 मुख्य रस्त्यांवरून वाहतूक वळवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. यासह शहरात विविध ठिकाणी नो पार्किंग झोन असणार आहे.
शहरात दोन दिवस जड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. शहरात वाहतूक सुरळीत राहावी आणि गर्दी नियंत्रणात राहावी म्हणून पुणे पोलिसांनी दोन दिवस वाहतुकीत मोठे बदल केले आहेत.
वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते
शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, कुमठेकर रोड,
गणेश रोड ,केळकर रोड, टिळक रोड, जंगली महाराज
रस्ता, कर्वे रोड, FC रोड, भांडारकर रस्ता पुणे सातारा
रोड, प्रभात रोड