थोडक्यात
पुण्यात चाललंय तरी काय? गुन्हेगारीने गाठला कळस
डेक्कन चौपाटी येथे एकाला डोकं फुटेपर्यंत मारलं
डेक्कन पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली
(Pune Breaking) पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न विचारण्याची पुन्हा एकदा वेळ आली आहे. पुण्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली असून गुन्हेगारीने कळस गाठल्याचे पाहायला मिळत आहे. डेक्कन चौपाटी येथे एकाला डोकं फुटेपर्यंत मारल्याची घटना घडली आहे.
जेवायला बसण्याच्या कारणावरून ही हाणामारी झाली असून सराईत गुन्हेगारांनी एका व्यक्तीला डोकं फुटेपर्यंत मारलं आहे. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खुर्च्या तुटेपर्यंत एकाला मारहाण करण्यात आली असून याप्रकरणी आता डेक्कन पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून अटकेतील आरोपी गणेश रणखांब हा मकोकातील गुन्हेगार असल्याची माहिती मिळत आहे.