Harbour Line Mega Block 
मुंबई

Harbour Line Mega Block : कामासाठी घराबाहेर पडणार आहात? त्याआधी रेल्वेच्या मेगाब्लॉकचं वेळापत्रक जाणून घ्या

कामासाठी जर घराबाहेर पडणार आहात तर त्याआधी रेल्वेच्या मेगाब्लॉकबद्दल जाणून घ्या.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Harbour Line Mega Block) कामासाठी जर घराबाहेर पडणार आहात तर त्याआधी रेल्वेच्या मेगाब्लॉकबद्दल जाणून घ्या. हार्बर मार्गावरील पनवेल येथे विविध अभियांत्रिकी कामांसाठी शनिवारी रात्री 12 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे.

या ब्लाकमुळे बेलापूर-पनवेल लोकल सेवा उपलब्ध नसणार आहे. पनवेलकडे जाणाऱ्या लोकल सेवा बेलापूर, नेरळ, वाशी तसेच ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा नेरुळ, वाशी येथे रद्द केल्या जाणार असल्याची माहिती मिळत असून रविवारी सीएसएमटी-पनवेल आणि सीएसएमटी-वडाळा लोकलही रद्द असणार आहे.

पनवेल स्थानकाच्या फलाट क्र. 2 वर पायाभूत कामांसाठी बेलापूर ते पनवेल दरम्यान अप व डाऊन मार्गावर शनिवारी रात्री 11.45 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 11.45 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार

ब्लॉक दरम्यानचे वेळापत्रक

शनिवारी रात्री १०.५०ची सीएसएमटी-पनवेल लोकल बेलापूरपर्यंत

शनिवारी रात्री १०.५५ची ठाणे-पनवेल लोकल रद्द असेल.

⁠रविवारी सकाळी ९.२८, ११.२८ची पनवेल-सीएसएमटी लोकल वाशी येथून सुटेल

⁠रविवारी सकाळी ११.५२ची पनवेल-सीएसएमटी लोकल बेलापूर येथून सुटेल.

⁠रविवारी सकाळी ८.४१, १०.०१ ची ठाणे-पनवेल लोकल, सकाळी ९.०४, ११.४२ ची ठाणे-नेरूळ लोकल, सकाळी १०.२०ची ठाणे-वाशी लोकल रद्द.

⁠रविवारी सकाळी १०.५८ वाजताची वाशी-ठाणे, सकाळी ९.४२ ची नेरुळ-ठाणे, सकाळी ७.४३, ८.०४, ९.०१, १०.४१ आणि ११.०२ पनवेल-ठाणे लोकल रद्द.

Summery

  • अभियांत्रिकी कामांसाठी शनिवारी रात्री १२ तासांचा ब्लाक घेतला जाणार

  • या ब्लाकमुळे बेलापूर-पनवेल लोकल सेवा उपलब्ध नसणार

  • पनवेलकडे जाणाऱ्या लोकल सेवा बेलापूर, नेरळ, वाशी तसेच ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा नेरुळ, वाशी येथे रद्द केल्या जाणार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा