थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai Garbage Vehicle ) मुंबईतले सफाई कामगार हे स्वच्छता दूत समजले जातात. संपूर्ण मुंबई स्वच्छ ठेवण्याचं काम या कर्मचाऱ्यांवर असतं. रोज सकाळी मोठ्या ट्रेलरवरून कचरा गोळा करताना आपण या कर्मचाऱ्यांना पाहत असतो. मात्र रोज मुंबई स्वच्छ करणारे कर्मचारी सध्या अडचणीत आले आहेत. ज्या मोठ्या गाड्यांवर हे कर्मचारी काम करतात त्या गाड्यांची दुरवस्था झालीय.
त्यामुळे या गाड्यांचा जर अपघात झाला किंवा काम करताना कर्मचाऱ्यांबरोबर एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे या सफाई कर्माचाऱ्यांना न्याय कधी मिळणार हे देखील महत्त्वाचे आहे. मुंबई महानगरपालिकेने आमच्या सुरक्षा कडे लक्ष द्यावं अशी मागणी देखील कर्मचारी करताना पाहायला मिळत आहे.
मुंबई महापालिकेतील कचरा वेचक कर्मचा-यांचं आयुष्य धोक्यात असून धोकादायक कचरा वेचक गाड्यांच कॉंन्ट्रॅक्ट संपवलं असले तरी 15 वर्ष केवळ एकाच व्यक्तीला कॉंन्ट्रॅक्ट दिलं जात असल्याची माहिती मिळत आहे.
कचरा संकलनामध्ये 3 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा कचरा वेचक कर्मचाऱ्यांकडून आरोप करण्यात येत आहेत. मात्र एवढे सर्व आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असताना देखील यावर अधिकाऱ्यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे. त्यामुळे आता यावर अधिकारी अद्याप गप्प का आहेत? असा सवाल लोकशाही मराठीकडून करण्यात येत आहे.
Summery
मुंबईत कचरा संकलनात 3 हजार कोटींचा घोटाळा, कचरा वेचक कर्मचाऱ्यांचा आरोप
धोकादायक गाड्यामधून कर्मचाऱ्यांचा प्रवास
अधिकारी अद्याप गप्प का? लोकशाही मराठीचा सवाल