थोडक्यात
मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी कारवाई विरोधात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलन
गर्दीमुळे ट्रेनच्या धडकेत 2 जणांचा मृत्यू
आंदोलंकावर गुन्हा दाखल होणार का ?सवाल उपस्थित
(Mumbai) मुंब्रा येथे झालेल्या अपघातानंतर पोलिसांनी दोन अभियंत्यांवर गुन्हे दाखल केले आणि त्याच्या विरोधात रेल्वे कर्मचारी संघटनेनं आज आंदोलन केलं. यामुळे लोकलचं वेळापत्रक विस्कळीत झालं असून, अनेक गाड्या उशिराने धावल्या, तर काही रद्द करण्यात आल्या. प्रमुख स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली.मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सीएसएमटी स्थानकात उभ्या होत्या.
या रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचा परिणाम प्रवाशांना बसला प्रवाशांची मोठी गर्दी झाली. या गर्दीमुळे चार प्रवासी लोकल ट्रॅकवरुन चालत असताना लोकलची धडक बसल्याची धक्कादायक घटना घडली असून यात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
ट्रेनमधून खाली पडलेल्या प्रवाशांना जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी आता या आंदोलंकावर गुन्हा दाखल होणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.