(Dadar Kabutar Khana) कबुतरखाना हटवण्यावरून दादरमध्ये जोरदार राडा झाला होता. कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवून जैन समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भातील याचिकेवर गुरुवारी सुनावणी घेण्यात आली.
मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना खायला घालण्यावर असलेली बंदी कायम ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर आता पुन्हा एकदा कबुतरखान्याजवळ कबुतरांसाठी गाडीच्या टपावर खाद्य ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
कबुतरखाना बंद केल्यानंतर गाडीच्या टपावर हे खाद्य ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. स्थानिक नागरिकाकडून खाद्य टाकण्यास मनाई करण्यात आली मात्र आमच्या अजून 12 गाड्या येणार असल्याचे त्या खाद्य टाकणाऱ्या माणसाने सांगितल्याचे पाहायला मिळत आहे.