थोडक्यात
कूपर रुग्णालयात आणखी एका रुग्णाला उंदराचा चावा
जोगेश्वरीत राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेच्या पायाला चावा
एका महिन्यात आतापर्यंत 3 घटनांची नोंद
(Cooper Hospital) कूपर रुग्णालयात आणखी एका रुग्णाला उंदराने चावा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. एका महिन्यात आतापर्यंत 3 घटनांची नोंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जोगेश्वरीत राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेच्या पायाला उंदराने चावा घेतला आहे.
दिवसभरात 20 ते 25 उंदीर सापळ्यात अडकले असल्याची माहिती मिळत असून त्यासाठी 10 पिंजरे, 35 गम पॅड्स लावण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर कूपर रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी तातडीने रविवारी स्वच्छता मोहीम राबविली.